चंद्रपूर जवळील जुनोना जंगलालगत गावात आज 23 आगस्ट 12 वाजता जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलावर अचानक एका अस्वलाने हल्ला केल्याने पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहे .जुनोना गावातील अरुण कुकसे हे त्यांचा मुलगा विजयसोबत जंगलात पाने गोळा करण्यासाठी गेले होते. अचानक झुडपातून आलेल्या अस्वलाने सर्वात आधी अरुण यांच्यावर हल्ला केला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या विजयवरही अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.