पालघर तालुक्यातील शिरगाव आणि सातपाटी समुद्रकिनारी तीन कंटेनर आढळून आले आहेत. नागरिकांनी या कंटेनरच्या जवळ जाऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे. कंटेनर हे ओमान येथील एका बुडालेल्या जहाजातील असून अरबी समुद्रात वाहून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून एसओपी नुसार समुद्रकिनाऱ्यालगत आढळून आलेले कंटेनर हटवण्याची कारवाई करणार येणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली आहे.