सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव यावर्षीही शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. गणेशविसर्जन मिरवणुकीसाठी महसूल, पोलीस व महापालिका प्रशासन सज्ज असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरजेत सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस बंदोबस्त व विसर्जन मार्गाची पाहणी फुलारी यांनी केली. यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदी