पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दिणांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक वर्धा यांचे निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील 19 विविध पोलीस स्टेशन हद्यीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोहिम राबवून जिल्हयात अवैद्यरित्या दारू विक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांनावर एकूण 36 जणांना ताब्यात घेत 11 लाख 52 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,तर 32 आरोपीतांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे.सदर मोहिम एकत्रित रित्या वर्धा जिल्हा पोलीसांतर्फे राबविण्यात आली आहे.