पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील मानकापूर उडान पुलावर स्कूल व्हॅन व स्कूल बस मध्ये आमोरासमोर धडक होऊन यामध्ये स्कुल व्हॅन मध्ये असलेले विद्यार्थी व चालक जखमी झाले होते. त्यांचा उपचार खाजगी रुग्णालयात सुरू होता. उपचारादरम्यान स्कूल व्हॅन चालक रितिक कनोजिया वय 24 वर्ष व विद्यार्थिनी सान्वी खोब्रागडे वय 14 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर इतर विद्यार्थी जखमी असून त्यांचा उपचार रुग्णालयात सुरू आहे.