आज दिनांक 6 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पासून शिरखेड पोलिसांच्या चोख बंदोबस्तात नेरपिंगळाई येथे गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. नेरपिंगळाई येथील गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याने व गणेश विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी यात्रेचे आयोजन राहत असल्याने गणेश भक्ताची प्रचंड प्रमाणात गर्दी नेरपिंगळाई येथे राहत असते. गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे याकरिता शिरखेड पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवला असल्याचे दिसून आले