सेनगांव तालुक्यातील भंडारी गावाजवळील पुल सततच्या पावसामुळे खचला असून त्यामुळे या मार्गावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. जवळपास 40 ते 50 विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे सुद्धा बंद झाले.भंडारी जवळील ओढ्यावरील पुल तुटल्यामुळे मानव विकास योजनेअंतर्गत चालणारी शालेय विद्यार्थ्यांसाठीची बस सेवा देखील बंद झाल्याने तात्काळ प्रशासनाने सदर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता केली आहे.