लोणवाडी गावामध्ये मागील भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. रविवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता लोणवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमध्ये मिलींद हिरालाल धाडी आणि त्यांचे वडील हिरालाल धाडी यांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.