गणेशोत्सव विसर्जन घाटाची पाहणी व सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मौजे तळेहिप्परगा येथे रविवारी दौरा केला. त्यांनी तलाव परिसर, मिरवणूक मार्ग व सुरक्षेच्या सोयी तपासून मार्गदर्शन केले तसेच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसोबत रूट मार्चही काढला. पहाट उपक्रम व विकसित गाव अभियानांतर्गत त्यांनी पारधी वस्ती व अंगणवाडीस भेट देऊन मुलांशी संवाद साधला.