अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास शहर पोलिसांनी शर्मा टर्निग येथे ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजे दरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून ४१०० रुपयाचा देशी दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पोकॉ. गणेश कोल्हे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शर्मा टर्निंग येथे छापा टाकून नितीन भाऊराव विरघट वय 37 वर्षे रा. कुरखेड, यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारुच्या १०० नग शिश्या जप्त.