भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण व खणीकर्म डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयीन दालन मुंबई येथे दिनांक १० सप्टेंबर रोजी दु. २ वा. दरम्यान भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तसेच त्यासोबत पालघर जिल्हा कारागृहाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली.