राजुरा विधानसभा क्षेत्रातील पाटण येथे आज दि ७ सप्टेंबर ला १२ वाजता आयोजित काँग्रेस कार्यकर्ता बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी संघटन बळकटीसह जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला.