अकोट न्यायालयात शनिवार 13 रोजी राष्ट्र लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये एकूण चार पॅनल मध्ये दिवानी, फौजदारी, मोटर अपघात प्रकरणे, बँकेचे प्रकरणे, दाखल पूर्व प्रकरणे, दाखल पूर्व बँकेची प्रकरणे, एम एस सी बी,बी एस एन एल, ग्रामपंचायत घरपट्टी,पाणीपट्टी व घरकुलची प्रकरणे ठेवण्यात आली होती.यापुढील एकूण 145 दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच एकूण 383 दाखलपुर्व प्रकरणे असे एकत्रित 528 प्रकरणे निकाली काढण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समिती द्वारा देण्यात आले