डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून काल सायंकाळी एका तरुणाने उडी मारल्याची घटना घडली. त्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली. चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याने दारूच्या नशेत उडी मारल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तातडीने त्याला रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू केले,मात्र रुग्णालय परिसरात घडलेल्या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.