म्हसरूळ परिसरातील स्नेह नगर, दिंडोरी रोड येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेण्याची घटना दिनांक 29 ऑगस्ट रोजी घडली असून रात्री अकरा वाजता म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 ऑगस्ट रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार जोस्तना जयंत माडीवाले राहणार स्नेहनगर, दिंडोरी रोड, जय विजय सोसायटी या गिरणी मधून दळण घेऊन घरी परत जात असताना स्नेहनगर येथे मोपेड दुचाकीवर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले.