लातूर -लातूर जवळील काटगाव येथील मीराबाई महादेव काळुंखे (वय 35) हिचा खून अपघाताचा बनाव करून करण्यात आला असल्याचा आरोप मुलीने केला असून, आरोपी सचिन सूर्यवंशीला पोलिसांनी ताब्यात घ्यावे, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय परिसरात घेतली होती.