हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मुडशिंगी गावात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप उचकटून घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे 2, लाख 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.फिर्यादी सुनिल श्रीकांत परिट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी घडली. चोरट्याने घरातील सोन्याचे गंठण, अंगठ्या, कर्णफुले, सोनसाखळ्या, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज चोरला.