पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील जप्त असलेला मुद्देमाल सुमारे 11 ग्रॅम वजनाचा दीड लाख रुपये किमतीचा एक सोन्याचा नेकलेस व 1500/- रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल फिर्यादी अश्विनी राजेश डहाळे वय 33 वर्ष राहणार वृंदावन पार्क गिरणा पंपिंग रोड पाचोरा यांना आज दिनांक 11 सप्टेबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्याकडून दोन पंचांसमक्ष ताब्यात देण्यात आला आहे, चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकाला परत मिळाला,