: सहकुटुंब शनिवार वाडा परिसरात देखावे पाहण्यासाठी आलेल्या रिक्षाचालकाची रिक्षा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक कल दुपारी कुटुंबीयांसोबत शनिवार वाडा परिसरात आला होता. त्याने रिक्षा बाजूला उभी केली होती. दरम्यान, चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून रिक्षा चोरून नेली. देखावे पाहून परतल्यानंतर रिक्षाचालकाला आपली रिक्षा जा