फ्रँचाईजीच्या आमिषाने ६२ लाख ८५ हजार ६९७ रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय नाथा जगदाळे (वय ४०, रा. रेल्वे स्टेशनजवळ, जयसिंगपूर, सध्या रा. जमखंडी, कर्नाटक) याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे.कर्नाटकातील जमखंडी येथे सापळा रचून गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.आज शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी आठ वाजता जयसिंगपूर पोलिसांनी ही माहिती दिली.