बीड जिल्ह्यातील सिंधफना नदीला पुन्हा एकदा महापूर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, पूल आणि घाट परिसरात गर्दी करू नये, तसेच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे सूचनाही देण्यात आल्या आहेत.