महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट ट्रॅक्टरचे सुटे भाग (पार्ट्स) विकणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता एस.टी. वर्कशॉपसमोरील 'शहनशाह ट्रॅक्टर अँड अर्थ मुव्हर्स' या दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १३ हजार ६१५ रुपयांचे बनावट उत्पादने जप्त करण्यात आला. याबाबत रात्री ११ वाजता दुकानमालक दीपक नंदलाल पोपली (वय ३२, रा. गणपती नगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.