Download Now Banner

This browser does not support the video element.

खामगाव: सिव्हील लाईन येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या

Khamgaon, Buldhana | Jul 31, 2025
शहरातील सिव्हील लाईन येथे एका २९ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. सिव्हील लाईन येथील सागर भगवंतराव निबाळकर (देशमुख ) वय २९ वर्ष याने राहत्या घरात गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात नेले. मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us