लेहगाव शेत शिवारालगत असलेल्या भुलेश्वरी नदी काठी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.हा इसम नदीच्या पुरात वाहून आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेत शिवारात एका शेतकऱ्याला हा मृतदेह नदी काठी दिसून आला. याची माहिती शेतकऱ्याने पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला व शव विच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे पाठविला.मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.