पालवण येथे शिवसेना कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, या घटनेने गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्या बहिणी भाग्यश्री सोजे हिलाही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जखमी केले.