ग्रामपंचायत सिगणापूर येथे अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढत असल्याने अवैध दारू ही सहजरित्या धाब्यावर दुकानावर तरुणांना उपलब्ध होत असल्याने गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने सिगणापूर ग्रामपंचायतीने 24 ऑगस्ट रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता. परंतु अद्यापही गावातील दारू दारू विक्री सुरू असल्याने गावातील महिला आक्रमक झाल्या असून गावातील दारू विक्री तात्काळ बंद करावी अन्यथा 2 ऑक्टोबर रोजी उत्पादन शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला