नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून स्थानिक आमदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काल जिल्ह्यातील दुर्गम भागात दौरा करण्यात आला असून जिल्ह्यातील आरोग्य सेवा कुपोषण आणि आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवा टास्क फोर्सच्या माध्यमातून सुधारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले.