लातूर -,मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी लातूर जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव बुधवारी (दि. २७) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गस्थ होणार आहेत. यासाठी हजारो वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने आंदोलनस्थळ गाठले जाणार आहे. अशी माहिती आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी मराठा समाज बांधवांच्या वतीने सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.