शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन धडकणार आहे. कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाची रणनीती ठरली असून सरकारला दोन महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय. सुरुवातीला विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानंतर 28 ऑक्टोबरला मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांशी बोलताना दिली आहे.