कल्याण परिसराच्या अत्रे हॉल येथे असलेल्या शंकरराव चौकामध्ये एसबीआय चे एटीएम मशीन आहे. या एटीएम मशीनला लक्ष करत दोन चोरट्यांनी त्याला फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या चार तासांमध्ये दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. मंगेश जगताप आणि अन्सारी अशी दोन्ही आरोपींची नावे असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.