हेरले येथे सोमवारी दि. २५ ऑगस्ट हरून जमाल देसाई (वय ४२) यांच्यावर पूर्व वैमनस्यातून नऊ जणांनी एकत्र येत प्राणघातक हल्ला केला.सध्या त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हरून देसाई हे आपल्या कुटुंबासह हेरले येथील माळभागावर राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा प्रेम विवाह इब्राहिम खतीब यांच्या भाच्याशी झाला होता.रविवारी (दि. २४) गावात दर्गा कमिटीने चारशिंबा जेवणाचे आयोजन केले होते.त्यावेळी किरकोळ वादातून हरून यांनी पत्नीला शिवी दिली.