श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना बहुजन कल्याण मंत्रालयामार्फत राबवली जात आहे धनगर समाजातील गोरगरीब मुलांना शाळांमध्ये शिकवण्यासाठी राबवली जाते मात्र या योजनेचा गैरफायदा घेऊन कोट्यावधी रुपये कमवले जात आहेत.धक्कादायक म्हणजे बीडच्या शिरूर तालुक्यातील शृंगार वाडी येथील यशवंत राजे होळकर या योजनेखाली बाल नंदनवन इंग्लिश स्कूल हंगामी वस्तीग्रह सुरू आहे मात्र या वस्तीगृहामध्ये चक्क लहान लहान आठ ते दहा वर्षांच्या चिमुकल्यांना हाताने कपडे धोयला लावणे बाथरूम साफ करणे असे प्रकार उघडकीस आले.