जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा तसेच तालीम कुस्तीगीर संघ जिल्हा भंडारा यांच्या वतीने तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज दि. 1 सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी 12 वाजता भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मधुकर कुकडे, भाजपचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पडोळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.