विरार- मारंबळपाडा जेटी परिसरात विसर्जनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पाय घसरून तो वैतरणा खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दोघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बाहेर येणे शक्य झाले नाही व तिघेही पाड्यात बुडू लागले. रो- रो फेरीबोट व खलाशाच्या मदतीने तिघांना सुखरूप पाण्या बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.