महावितरण कंपनीने खोटे जास्तीचे वीज बिल पाठवून त्यानंतर बिल दुरुस्त करायला गेलेल्या ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी आज शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता केला आहे.धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की,अनेक ग्राहकांनी चुकीच्या व जादा बिलांची तक्रार महावितरणकडे केली असता, अधिकाऱ्यांनी ‘स्मार्ट मीटर बसवल्याशिवाय बिल दुरुस्त केले जाणार नाही’ असे ठामपणे सांगितले.