अजित पवार तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याची चर्चा होत आहे. यात एमआयएम आणि वंचित यांचा समावेश असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही शक्यता एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाकारली आहे. अद्याप असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. मात्र आला तर आम्ही त्यावर चर्चा करू अशी माहिती जलील यांनी हडको भागात 15 जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दिली. तर आघाडीवर चर्चा होत असताना मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींना किती संधी मिळेल हे पाहू, मग चर्चा करून निर्णय घेऊ अस जलील यांनी सांगितले