लातूर - लातूर जिल्हा आणि मुंबई शहराला जोडणाऱ्या नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या सुरू होण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी नुकत्याच केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि संबंधित अधिकाऱ्यांशी केलेल्या संवादातून मुंबई-लातूर वंदे भारत एक्सप्रेस चलवण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांनी यासाठी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून, वंदे भारत सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.