एरंडोल शहरात आदर्श नगर आहे. या आदर्श नगरात रोणीत सुरेश ठाकरे वय २९ हा तरुण आपल्या घरी होता. या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय एरंडोल या ठिकाणी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.