नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अंबासनमध्ये कुत्रे व मांजरींना विष देऊन ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार - 20 हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज, गावात संतापाची लाट Anc: बागलाण तालुक्यातील अंबासन गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील एका डुक्कर मालकाने स्वतःच्या डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची घटना समोर आली असून, यात सुमारे वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.