आज ९ सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री साडे ९ वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकांमुळे घडतो. शिक्षकांच्या वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम पडतो. त्यामुळे शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले.जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.मिलींद कुबडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुगल.....