हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनवर यलो मोझक व चारकोल स्टॉटसह विविध रोगाचे आक्रमण झाल्याने कोवळ्या शेंगा वाळून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख राजेंद्र खूपसरे, उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे,उपस्थित होते.