अवैधरित्या निदर्यतेने २० जनावरांना वाहनात कोंबून नेताना उमरेड पोलिसांनी कारवाई करित २० गोवंशांची सुखरूप सुटका केल्याची घटना आज १८ जून बुधवारला रात्री साडेसात वाजता केली आहे पोलिस शिपाई रमेश टेकाम यांना मोहपाकडून उमरेडकडे एका ट्रकमध्ये कत्तलीकरिता अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली