महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या निर्देशान्वये जिल्हा व सत्र न्यायालय तसेच हिंगणघाट, पुलगांव, आर्वी, आष्टी, कारंजा (घा.), सेलु, समुद्रपूर येथील तालुका न्यायालयांमध्ये दि. १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अदालतीला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी उपस्थित राहणार आहे.