नवजिवन तान्हा पोळा समितीतर्फे शहरातील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर उत्सव समितीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्षे असल्याने पोळ्यात सहभागी बालगोपालांसाठी लकी ड्रॉ पध्दतीने बक्षीसांची मोठी लयलूट होती.शहरातील बालगोपाल आकर्षक वेशभुषेसह सजविलेले नंदीबैल घेऊन पोळ्यात सहभागी झाले होते. यावेळी अनेक बालगोपालांनी आपल्या नंदिबैलांसोबत विविध विषयांवर आकर्षक देखावे सादर करुन प्रबोधन केले.पोळा बघण्यासाठी शहरातील नागरीकांनी एकच गर्दी केली होती.