खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या,रस्त्याची दुरावस्था,आरोग्यसेवा आणि जलजीवन मिशनची अपूर्ण कामे या विषयावर महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकारी कर्मचाऱ्यांचा क्लास खासदारांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करणे.नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा बळकटी देणे यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.