जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवे परिमाण देण्यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.