लातूर -लातूर शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व ड्रेस कोड लागू करण्यात यावे याकरिता लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीच्या वतीने मनपा. आयुक्तांना अनेकवेळा लोकशाही मार्गाने निवेदने देऊनही, मनपा.आयुक्त मानसी मीना यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे जुलै महिन्यात परत एकदा आयुक्तांना निवेदन देण्यात येऊन लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सांगितले असतानाही आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही.