छत्रपती शिवाजी नगर येथील श्री संत गाडगेबाबा व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचा आखाडा हा आज मुला-मुलींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. वस्ताद राजेंद्र गोतमारे यांनी २०१० साली स्वखर्चाने या आखाड्याची स्थापना केली असून, दिनांक 21ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता ६० मुली व १२० मुलं नियमित सराव करतांना दिसल्या. मुलींना कुस्ती शिकवणारा हा अकोल्यातील एकमेव आखाडा असून येथे शुल्क घेतले जात नाही तर साहित्य व सुविधा वस्ताद स्वतः पुरवतात. याच अखाड्यातून राज्यस्तरीय पदकविजेते, विदर्भ चॅम्पियन, तसेच पोलीस, आर्मी