शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावात विवेकानंद दूध उत्पादक संस्थेची मागील आठ दिवसापूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. सदर निवडणुकीदरम्यान डेरी बचाव पॅनल चा दणदणीत विजय झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सदर संचालकांच्या उपस्थितीत चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. सर्व संचालकांच्या ठराव मताने चेअरमन पदी मनोज निकम तर व्हॉइस चेअरमन पदी भीमसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली. यावेळेस गावातील नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.