जिंतूर तालुक्यातील बेलुरा, पिंपळगाव काजळे, पिंपळगाव काजळे तांडा, भोसी, आडगाव येथे आज सोमवार दि 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता स्वीप पथकाद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप, तहसीलदार राजेश सरवदे, दिनेश झांपले, नायब तहसीलदार सुग्रीव मुंडे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती करण्यात आली.